मुंबई : विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वादंग उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लावलेल्या कुलगुरूंच्या निर्णयानंतरही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. परिणामी, विद्यार्थी संघटनेसह पालकांनी आक्रोश केला आहे. शिवाय ठराव मांडणाºया डीनवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे.देशमुख यांच्या आॅनलाइन असेसमेंटचा निर्णय योग्य होता, असे म्हणत अॅकॅडमिक कौन्सिलच्या काही सदस्यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र यावर टीका होत आहे. कुलपती विद्यासागर राव यांनी त्याच्याविरोधात कारवाई केली. शिवाय त्यांना सुट्टीवर पाठविले. मात्र तरीही अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. परिणामी, विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली.मनविसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी म्हणाले, निकाल बाकी असताना स्वत:ची पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. युवा सेनेचे माजी सिनेट प्रदीप सावंत यांनी तर अभिनंदनाऐवजी एफआयआर दाखल करा, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेले यांनी विद्यापीठाचा समाचार घेत अभिनंदन करणार असाल तर याविरोधात जोडे मारो आंदोलन करणार असल्याचे सांगितले.या सर्व प्रकरणाची राज्यपालांनी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असे मुक्ता संघटनेचे वैभव नरवडे यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुखांच्या अभिनंदनावरून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 3:00 AM