नाराज मनविसे उपाध्यक्षाचा राजीनामा

By admin | Published: February 6, 2017 03:31 AM2017-02-06T03:31:28+5:302017-02-06T03:31:28+5:30

महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर, उमदेवारी मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांपासून इच्छुकांनीही आपल्या पक्षांकडे तगादा लावला

Angered Manavya Upadhyay resigns | नाराज मनविसे उपाध्यक्षाचा राजीनामा

नाराज मनविसे उपाध्यक्षाचा राजीनामा

Next

मुंबई : महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर, उमदेवारी मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांपासून इच्छुकांनीही आपल्या पक्षांकडे तगादा लावला. उमेदवारी मिळणे अशक्य असल्याने काहींनी बंडखोरीही केली आणि काहींनी थेट नाराजी व्यक्त केली. शिवसेना, भाजपा, काँग्रेसबरोबरच मनसे पक्षातही नाराज कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग ९५मधून उमेदवारी न मिळाल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष (महाराष्ट्र) अखिल चित्रे यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला.
चित्रे यांनी हा राजीनामा देताना मनसेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत पक्षाला दिलेली साथ याचा लेखाजोखा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर ठेवला. मनसैनिक झाल्यानंतर भारतीय दंडविधान, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, शांतता राखायचे बंधपत्र, तडीपारी अशा अनेक बाबी अंगावर घेतल्या. अनेकदा जीव झोकून काम केले. कामात कधीच कुचराई केली नाही. माझ्याकडून त्रुटी राहिली कुठे, असा प्रश्न उपस्थित करत, त्यांनी नेतृत्वाला साद घातली आहे. यासंदर्भात चित्रे यांच्याशी संपर्क साधला असता, राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. मात्र, पुढच्या काळात मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले. निष्ठावान कार्यकर्त्यांना मिळालेल्या या वागणुकीचा फटका पक्षाला बसणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एच ईस्ट वॉर्डातील प्रभाग ९५मध्ये निर्मलनगर, खेरवाडी शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी गार्डन हा परिसर येतो.

Web Title: Angered Manavya Upadhyay resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.