Join us  

९५ वर्षीय स्वातंत्र्यसैनिकावर अ‍ॅन्जीओप्लास्टी

By admin | Published: July 03, 2014 2:20 AM

महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकारी समितीचे सदस्य सचिव भिकू दाजी भिलारे हे वयाच्या ९५ व्या वर्षी रोज मंत्रालयात येऊन काम करतात.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकारी समितीचे सदस्य सचिव भिकू दाजी भिलारे हे वयाच्या ९५ व्या वर्षी रोज मंत्रालयात येऊन काम करतात. स्वातंत्र्यसैनिकांसाठी असलेल्या मंत्रालयात असलेल्या विभागाचे कामकाज ते पाहतात. शनिवारी अचानक त्यांना घाम फुटला, छातीत दुखायला लागले म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हृदयातील धमनी ९० टक्के ब्लॉक असल्याचे अ‍ॅन्जिग्राफी केल्यावर लक्षात आले. यानंतर सोमवारी त्यांच्यावर अ‍ॅन्जिप्लास्टी केली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल यांनी सांगितले.इतक्या वयस्कर व्यक्तीची अ‍ॅन्जिओप्लास्टी करणे हे दुर्मीळ आहे. मात्र अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यासाठी जी शारीरिक तंदुरुस्ती हवी असते ती स्वातंत्र्यसैनिक भिकू भिलारे यांच्याकडे असल्यामुळेच आम्ही अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वय इतके जास्त असले तरी त्यांना इतर कोणताच आजार नाही, ही या केसमधली सर्वात मोठी गोष्ट होती. याआधी त्यांना कोणताही हृदयासंबंधीचा त्रास झालेला नव्हता. त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाल्याचे मुख्य कारण त्यांचे वय हेच आहे. वयोमानानुसार त्यांना रक्तदाब आणि मधुमेह झाला आहे. याचा परिणाम म्हणूनच त्यांच्या हृदयामध्ये ब्लॉकेज झाले होते. मात्र एकाच धमनीमध्ये हे ब्लॉकेज होते. अ‍ॅन्जिओप्लास्टी करून त्यांना एक स्टेण्ट बसवण्यात आला आहे, असे डॉ. गोयल यांनी सांगितले.