काँग्रेसच्या मराठी नगरसेवकांमध्ये नाराजी

By admin | Published: March 8, 2016 02:49 AM2016-03-08T02:49:17+5:302016-03-08T02:49:17+5:30

काँग्रेसच्या पालिकेतील नेतृत्वात तडकाफडकी बदल झाल्याची नाराजी आता ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये उमटू लागली आहे़ विशेष म्हणजे, हा बदल करताना विश्वासात न घेण्यात आल्याने

Angry in the Congress corporators of the Congress | काँग्रेसच्या मराठी नगरसेवकांमध्ये नाराजी

काँग्रेसच्या मराठी नगरसेवकांमध्ये नाराजी

Next

मुंबई: काँग्रेसच्या पालिकेतील नेतृत्वात तडकाफडकी बदल झाल्याची नाराजी आता ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये उमटू लागली आहे़ विशेष म्हणजे, हा बदल करताना विश्वासात न घेण्यात आल्याने अनेक जण दुखावले आहेत़ त्याचबरोबर, पक्षात ज्येष्ठ नगरसेवक असताना दुसऱ्या पक्षातून आलेल्या नगरसेवकाकडे नेतृत्वाची धुरा सोपविल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे़ यापैकी काही जणांनी प्रवीण छेडा यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी या विरोधात हालचाली सुरू केल्या आहेत़
२०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे अनेक राजकीय उलथापालथी होतील. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रवीण छेडा यांना विरोधी पक्षनेते पदी विराजमान केले़ याची कुणकुण लागू न देताच, देवेंद्र आंबेरकर यांची उचलबांगडी झाल्याने काँग्रेस नगसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे़ मात्र, यावर मुंबई अध्यक्षांशी उघड पंगा घेण्यास कोणी तयार नाही़
तिकीट वाटपावर वर्चस्व ठेवण्यासाठी निरुपम यांनी कामत गटाचा पत्ता साफ करण्यास सुरुवात केली आहे़ छेडा यांच्या नियुक्तीने गुजराती कार्ड निरुपम यांनी निवडणुकीपूर्वी वापरले आहे़ त्यांच्या या रणनितीला पक्षांतर्गतच विरोध होऊ लागला आहे़ विरोधी पक्षनेते म्हणून छेडा यांच्या नावाची घोषणा बुधवारी पालिकेच्या महासभेत होणे अपेक्षित आहे़ आपली शक्ती पणास लावून कामत गटाने या बदलावर स्थगिती आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Angry in the Congress corporators of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.