Join us

संतप्त अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By admin | Published: July 11, 2015 11:23 PM

मार्च महिन्यापासून न मिळालेले मानधन व पोषण आहाराची बिले वेळेवर मिळत नसल्याच्या निषेधार्थ वाड्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी माकपाच्या

वाडा : मार्च महिन्यापासून न मिळालेले मानधन व पोषण आहाराची बिले वेळेवर मिळत नसल्याच्या निषेधार्थ वाड्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी माकपाच्या पाठिंब्याने आज वाडा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविला.या वेळी संतप्त महिलांनी या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, पंकजा मुंडे हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद... अशा घोषणा देऊन वाडा परिसर दणाणून सोडला होता. खंडेश्वरी नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण वाडा गावातून रॅली फिरवून तिचे वाडा तहसील कार्यालयासमोर मोर्चात रूपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व माकपाच्या जनशक्ती महिला विभागाच्या अध्यक्षा मरियम ढवळे व अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा वृषाली पाटील यांनी केले.अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच पोषण आहार शिजविणाऱ्या महिला बचत गटांना अनुदान न दिल्याने पोषण आहार शिजविणेच बंद केले असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच मानधन एकाच वेळी व वेळेवर द्यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात येऊन तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. (वार्ताहर)