आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 29, 2024 18:01 IST2024-11-29T18:00:26+5:302024-11-29T18:01:08+5:30

दिंडोशीत शिंदे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला.

Angry women of Shinde Sena raised slogans against Sanjay Nirupam after the thanksgiving meeting | आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी

आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी

मुंबई-दिंडोशी विधानसभेचे शिंदेसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांना ७०२५५ मतदारांनी मतदान केले, त्यामुळे आभार प्रदर्शन सभेनंतर संजय निरुपम यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या संतप्त महिलांची अगदी खालच्या थरात शेरेबाजी व घोषणाबाजी करून कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिंडोशीत शिंदे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला.

दिंडोशीत उद्धव सेनेचे सुनील प्रभू यांनी निरुपम यांचा ६०५८ मतांनी पराभव करत हॅट्रिक केली.या मतदारसंघात प्रभू यांना ७६,११५ मते, तर संजय निरुपम यांना ७०,०५७ मते मिळाली होती. मतदारांनी आपल्याला ७०,०५७ मते देत जो विश्वासा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी काल सायंकाळी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम काल सायंकाळी ओबेरॉय मॉलच्या समोरील श्यामजी बापू सभागृहात आयोजित केला होता.

यावेळी शिंदे सेनेचे विधानसभा संघटक वैभव भरडकर यांच्या महिला कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांच्याविरोधात अतिशय खालच्या थरात शेरेबाजी चालू केली आणि कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी हजर असलेल्या पोलिसांनी त्या महिलांना ताबडतोब सभागृहाच्या बाहेर काढले, तरी त्या महिला बाहेर येऊन भरडकराच्या नावाने जयजयकार व निरूपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. कार्यक्रम संपल्यावर  गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, घोषणा देणाऱ्या शिंदे सेनेच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत वैभव भरडकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि आमचे पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी निरुपम हे येथील स्थानिक उमेदवार नसतांनादेखrल त्यांना ७००५७ मते मिळवून देण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली. इतके करूनही मतदारसंघाच्या बाहेरील निरूपम समर्थक रश्मी मिस्त्री व अरुण सुवर्णा यांनी निरुपम यांच्या पराभवाचा ठपका माझ्यासह भाजप विधान परिषद आमदार राजहंस सिंह,माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या विरोधात आमच्या महायुतीच्या सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकल्या. त्यामुळे आमच्या संतप्त महिलांनी निरुपम यांना जाब विचारला.त्यांनी काही उत्तर न त्यांनी पळ काढला त्यामुळे संतप्त महिलांनी त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली अशी माहिती त्यांनी दिली.सदर बाब आपण आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Angry women of Shinde Sena raised slogans against Sanjay Nirupam after the thanksgiving meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.