Join us

'एकदम कडssक' बातमी; मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 6:41 PM

'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे.

ठळक मुद्दे'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'नाळ' या दोन चित्रपटांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं

मुंबई : मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घ्यावी लागायची. हे चित्र होते काही वर्षांपूर्वीचं. 'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'नाळ' या दोन चित्रपटांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. त्यामुळे मोठे स्टार असलेल्या बॉलिवूड चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे.

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सैराट' सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. 'श्वास'नंतर मराठीत वेगवेगळ्या विषयांना हात घालणारे चित्रपट बनू लागले. सैराटच्या यशामुळे मराठी चित्रपटही कोट्यवधींचा नफा मिळवून देऊ शकतो हे सिद्ध झाले. त्यामुळे मुंबईतील चित्रपटगृहांवर मराठी सिनेमांचे वर्चस्व दिसू लागले आहे. दिवाळीत बॉलिवूड चित्रपटांचा सुळसुळाट सुरू असतो. यंदाच्या दिवाळीत अमिताभ बच्चन आणि आमीर खान अशी तगडी स्टारकास्ट असलेला  'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रदर्शित झाला. त्याला टक्कर देण्याचे धाडस 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने दाखवले. या लढाईत 'डॉ. काशिनाथ घाणेकर' ने बाजी मारली.

सुरुवातीला 'ठग्ज...'ला मुंबईत हजारहून अधिक स्क्रीन्स मिळाल्या होत्या, पण आता त्यांची संध्या दीडशेच्या आसपास आली आहे. दुसरीकडे '...काशिनाथ घाणेकर' सिनेमाच्या स्क्रीन मुंबईत १७७वरून ३००च्या घरात पोहोचल्या असल्याचे समजते आहे. 'नाळ' हा सिनेमाही ३००हून अधिक स्क्रीनमध्ये तो प्रदर्शित झाला होता. आज, त्याच्या स्क्रीनची संख्या ४००च्या घरात गेली आहे. त्यामुळे मुंबईतल्या सिनेमागृहात मराठी सिनेमांनी हिंदीला टाकलं मागे टाकल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ठग्ज ऑफ हिंदोस्तानला मुंबई व उपनगरात मिळून सुरुवातीला 1333 स्क्रीन्स देण्यात आल्या होत्या आता त्याची संख्या 150 वर आली आहे. याउलट 'नाळ'ची स्क्रीन्सची संख्या 300 वरून 400 व 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'ची संख्या 177 वरून 310 वर गेली आहे.   

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रनाळकाशिनाथ घाणेकर