Join us

अनिल अंबानींकडून जाणार ‘आरकॉम’ची सूत्रे, वायरलेस व्यवसाय एअरसेलमध्ये विलिन करण्याचे प्रयत्न फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:30 AM

रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) असलेल्या थकित कर्जांपैकी सात कोटी रुपयांच्या कर्जाची फेड कंपनीचे भागभांडवल घेऊन करण्याचे धनको बँकांनी ठरविल्याने रिलायन्स उद्योगसमुहातील या महत्वाच्या कंपनीचे नियंत्रण अनिल अंबानींच्या हातून जाईल.

मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) असलेल्या थकित कर्जांपैकी सात कोटी रुपयांच्या कर्जाची फेड कंपनीचे भागभांडवल घेऊन करण्याचे धनको बँकांनी ठरविल्याने रिलायन्स उद्योगसमुहातील या महत्वाच्या कंपनीचे नियंत्रण अनिल अंबानींच्या हातून जाईल. वायरलेस व्यवसाय एअरसेलमध्ये विलिन करण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर ही वेळ येणार आहे.सध्या ‘आरकॉम’चे ५९ टक्के भागभांडवल प्रवर्तक या नात्याने अनिल अंबानी यांच्याकडे आहे व त्या नात्याने कंपनीचे नियंत्रण त्यांच्या हाती आहे. देशी व विदेशी धनको बँकांनी थकित कर्जाच्या बदल्यात भागभांडवल घेतल्यावर अंबानी यांच्याकडे कंपनीचे केवळ २६ टक्के भांडवल शिल्लक उरेल.कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकानुसार रिझर्व्ह बँकेच्या ‘एसडीआर’ मार्गदर्शिकेनुसार सात हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज कंपनीच्या ५१ टक्के भागभांडवलात परिवर्तित करण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारे धनको बँकांना कर्जाच्या बदल्यात कंपनीचे भागभांडवल देण्यास कंपनीच्या भागधारकांनी २६ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी दिलेली आहे.‘आरकॉम’च्या मालमत्ता विकून त्यातून पारदर्शी पद्धतीने पैसे कसे वसूल करता येतील याविषयी सल्लागार म्हणून धनकोंच्या एकत्रित फोरमने एसबीआय कॅपिटल मार्केट््सची नेमणूक केली आहे.

टॅग्स :अनिल अंबानी