Join us

अनिल बोरनारे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

By रेश्मा शिवडेकर | Published: June 03, 2024 9:22 PM

बोरनारे यानी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.

मुंबईमुंबई शिक्षक मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने शिक्षक नेते आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

गेली २५ वर्षे आपण संघटनेचे कम काम करत आहोत. तीन वेळा आपल्या नावाचा पक्षाकडून विचार केला गेला. मात्र, या वेळेसही उमेदवारी नाकारण्यात आली आहे, अशा शब्दांत बोरनारे यानी आपली नाराजी व्यक्त केली.

गेले काही महिने मी आणि समर्थक कार्यकर्त्यांनी मुंबईतील शिक्षक मतदारसंघाची बांधणी करत होतो. मात्र आपले नाव डावलले गेल्याने कार्यकर्त्यांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. त्यांच्या आग्रहास्तव आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत मंगळवारी कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन निर्णय घेऊन असे त्यांनी सांगितले.

२०१८ मध्ये बोरनारे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नंतर अचानक त्यांना फॉर्म मागे घेण्यास सांगण्यात आले होते. बोरनारे गेली २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षक परिषदेत सक्रिय होते. सध्या ते भाजप प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

टॅग्स :भाजपामुंबई