अनिल देसाईंनी सुचवलं चिन्ह, उद्धव ठाकरे म्हणाले, आता 'पलिता'च लावण्याची वेळ आलीय....!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:59 PM2023-02-28T12:59:39+5:302023-02-28T13:01:18+5:30
सोमवारी मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
मुंबई: सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जागरुक राहावे लागेल. अनेक जण मला सांगतात की, साहेब निवडणुका येऊ द्या. या सगळ्याची तयारी तुम्हाला करायची आहे. ही आपल्याला एक मोठी संधी आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान, ते जिंकायचेच आहे, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला. सोमवारी मराठी भाषा दिवस आणि स्थानिय लोकाधिकार समिती सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
आज तुम्ही नाव चोरलेलं आहात, धनुष्यबाण चोरलेलं आहात. आमचं धनुष्यबाण घेऊन तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या, मी आमची मशाल घेऊन मैदानात येतो, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. तसेच हे बोलत असताना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी मला एक निशाणी सुचवल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमातील भाषणाद्वारे दिली.
अनिल देसाई यांनी धनुष्यबाणावर मशाल लावलेली असल्याचं चिन्ह दाखवलं. आता त्या बाणावरती पलिताच (चिंद्या गुंडाळून आग लावणे) लावण्याची वेळ आली आहे. अन्याय जाळायचा असेल तर पलिता लावावाच लागेल. कारण जे धगधगते विचार आहेत, तेच शिवसेना असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
#मराठी भाषा दिवस | ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस | बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई - #LIVE
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 27, 2023
प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे #UddhavThackeray#कुसुमाग्रज
🔴सोमवार-2️⃣7️⃣-0️⃣2️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣🔴 https://t.co/7ovaaXSQ3T
दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार-
आई-वडिलांनी दिलेले संस्कार झाले नाहीत की दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावर आली. आपले शत्रू कोण हे सर्वांना माहिती आहे. दूध का दूध और पानी का पानी आम्ही करणार. केवळ एवढेच नाही, तर तुमचे गोमूत्र कसे आहे, तेही आम्ही दाखवणार आहोत, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. सर्वोच्च न्यायालय शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ शिवसेनेचा नाही, तर देशाच्या भविष्याचा असेल, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"