Join us

अनिल देशमुख आरोप प्रकरण घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:06 AM

* १७ मार्च - परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होमगार्डकडे उचलबांगडी.* १८ मार्च - ‘लोकमत ...

* १७ मार्च - परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होमगार्डकडे उचलबांगडी.

* १८ मार्च - ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि ईयर’ सोहळ्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे परमबीर सिंग यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे वक्तव्य.

* २० मार्च - परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र.

* ५ एप्रिल - उच्च न्यायालयाचे जयश्री पाटील यांच्या याचिकेप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याचे सीबीआयला आदेश.

* ५ एप्रिल - अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा

* ६ एप्रिल - सीबीआयकडून प्राथमिक चौकशी सुरू.

* १४ एप्रिल - अनिल देशमुख यांची सुमारे १० तास चौकशी.

* २१ एप्रिल - सीबीआयचे अधीक्षक आर. गुजियाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.

* २४ एप्रिल - अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर निवासस्थानांसह १० ठिकाणी सीबीआयचे छापे.

* अधीक्षक गुजियाल यांच्याकडून फिर्याद

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिलला सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक आर. गुजियाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देशमुख व अन्य इसमावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम १९८८, २०१८ व आयपीसी विभाग १२०(ब) कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

................................