मुंबई :
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात चक्कर येऊन कोसळल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात होते. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मनी लॉन्ड्रिग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी देशमुख यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर ते चक्कर येऊन पडले. कारागृहातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलविले. यापूर्वीही एप्रिल महिन्यात आर्थर रोड कारागृहात चालताना पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. आहे. त्यानंतर जे. जे. रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या १०० कोटी वसुली, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या ईडीने १ नोव्हेंबरला रात्री देशमुखांना अटक केली. तेव्हापासून ते कारागृहातच आहेत.वैद्यकीय तपासण्या करून सोडलेदेशमुख यांना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास जे. जे. रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार व अन्य वैद्यकीय तपासण्या करून साडेसातच्या सुमारास त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जे. जे. रुग्णालय प्रशासनाने दिली.