Join us

'...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 12:25 PM

नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: देशाचे कृषिमंत्री राहिलेल्या महाराष्ट्रातील नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण केले. आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ साडेतीन लाख कोटींचे धान्य आधारभूत किमतीवर खरेदी केले. आम्ही एवढ्याच वर्षांत साडेतेरा लाख कोटींची खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे दिले, अशी तुलना करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. 

नरेंद्र मोदींनीशरद पवारांवर केलेल्या टीकेवर शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा शरद पवारांवर टीका केली, तेव्हा मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली, त्यावेळी अजित पवारांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं किंवा मोदींना दुरुस्त करायला हवं होतं. त्यांना थांबवायला हवं होतं. मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती, असं अनिल देशमुख म्हणाले. 

शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाची मला जाणीव असून आधारभूत किमतीत मोठा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शरद पवार हे शेतकऱ्यांचे देवदुत आहेत, असा उल्लेख मोदींनी केला होता. मात्र आता निवडणूक आल्याने नरेंद्र मोदींनी भूमिका बदलली, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. भारत अन्न धान्य मध्ये स्वयम् पूर्ण शरद पवारांच्या निर्णयाने झाला. ७१ हजार कोटींची कर्जमाफी शरद पवारांच्या निर्णयाने मिळाली, असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

अजित पवारांनी या कार्यक्रमात नरेंद्र मोदींचे कौतुक केले. गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितल्यास ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत असल्याचं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज नरेंद्र मोदी हे राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. याच कारणामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवारांनी सांगितले. 

आम्ही विकासाचे आकडे सांगतो, २०१४ पूर्वी भ्रष्टाचाराचे आकडे होते-

देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल, गरिबीला पुढे जाण्याची संधी मिळेल हाच सामाजिक न्याय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचे बजेटही वाढतेय. महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्यमान कार्ड दिलेत. या सर्व कार्डधारकांना ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराची हमी आहे. गरिबांना मोफत रेशनसाठी ४ लाख कोटींहून अधिक खर्च केलेत. गरिबांना घरे दिलीत. २०१४ च्या आधीच्या १० वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. नल ते जल योजनेत आतापर्यंत २ लाख कोटी खर्च झालेत. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कुटुंबांना मिळत आहे. मी इतके आकडे सांगतोय, २०१४ च्याआधीही तुम्ही आकडे ऐकत होता, पण किती लाख कोटींचा भ्रष्टाचार, घोटाळा हे होते. आता इतके लाख कोटींची विकासकामे, योजना असं आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

टॅग्स :शरद पवारअनिल देशमुखराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारनरेंद्र मोदी