अनिल देशमुख यांची चौकशी सुरूच; सीबीआयला पुन्हा मिळाली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 09:18 AM2022-03-05T09:18:09+5:302022-03-05T09:18:52+5:30

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला अनिल देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे.

anil deshmukh interrogation continues permission granted to CBI again | अनिल देशमुख यांची चौकशी सुरूच; सीबीआयला पुन्हा मिळाली परवानगी

अनिल देशमुख यांची चौकशी सुरूच; सीबीआयला पुन्हा मिळाली परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारपासून सीबीआयने आर्थर रोड कारागृहात देशमुख यांच्याकडे चौकशीला सुरुवात केली आहे. शुक्रवारी पथक पुन्हा आर्थर रोड कारागृह गाठून देशमुख यांची चौकशी केली. 

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात ईडीने देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात देशमुखांना अटक करण्यात आली. दुसरीकडे चांदीवाल आयोगासमोरील चौकशीदेखील अंतिम टप्प्यात आहे. यातच सीबीआयने त्यांच्याकडे पुन्हा चौकशी करण्यासाठी परवानगी द्यावी, याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. 
सत्र न्यायालयाकडून ३ ते ६ तारखेपर्यंत चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार गुरुवारी सीबीआयचे पथक आर्थर रोड कारागृहात त्यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. शुक्रवारी पुन्हा पथक कारागृहात दाखल झाले. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात येत आहे.

Web Title: anil deshmukh interrogation continues permission granted to CBI again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.