Anil Deshmukh : अनिल देशमुखांची 'डिफॉल्ट बेल'साठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 06:05 PM2022-06-13T18:05:12+5:302022-06-13T18:38:29+5:30

Anil Deshmukh : आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.

Anil Deshmukh rushed to court for default bail, opposed by the CBI | Anil Deshmukh : अनिल देशमुखांची 'डिफॉल्ट बेल'साठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध

Anil Deshmukh : अनिल देशमुखांची 'डिफॉल्ट बेल'साठी कोर्टात धाव, CBI ने केला विरोध

googlenewsNext

मुंबई :१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयात आपसूक (Default) जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली. मात्र आज या याचिकेला सीबीआयने विरोध केला. आता या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.

१०० कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयकडून (CBI)  आरोपपत्र (Chargsheet) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने 59 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्याकरीता विशेष सीबीआय कोर्टाने (Special CBI Court) मंजुरी देखील दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Anil Deshmukh rushed to court for default bail, opposed by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.