राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स धाडले होते. त्यानुसार अनिल देशमुख यांना आज सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचं त्यांचे वकील अॅड. जयवंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
'बघून घेऊ...', अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत संजय राऊत दोनच शब्दात बोलले!
ईडीकडून अनिल देशमुख यांना पाठवण्यात आलेल्या समन्समध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही. नेमकं कोणत्या मुद्द्यावर चौकशी केली जाणार आहे याची माहिती कळवली जावी याबाबतचा अर्ज ईडीच्या कार्यालयात दाखल केला आहे, अशी माहिती अॅड. जयवंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनिल देशमुखांचा पाय खोलात; पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदेंना ईडीकडून अटक
'ईडी'कडून अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापेईडीकडून काल अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. यात जवळपास ९ तासांहून अधिक काळ चौकशी झाली. त्यानंतर रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे स्वीयसहाय्यक आणि खासगी सचिवांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनाही ईडीकडून चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स धाडण्यात आले होते.