मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी ईडीकडे नोंदविलेल्या जबाबात राज्य सरकारचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे यांनी गाैप्यस्फोट केला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत दिलेल्या अहवालावर तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतेही उत्तर दिले नसल्याचे कुंटे यांनी जबाबात सांगितले. ईडीला दिलेल्या जबाबात कुंटे यांनी जुलै २०२० मध्ये रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये हस्तक्षेप होत असल्याच्या संशयातून काही फोन कॉल्स रेकाॅर्ड केले होते. शुक्ला यांनी त्याआधारे अहवाल तयार केला आणि तो जयस्वाल यांना पाठवला. जयस्वाल यांनी २७ ऑगस्टला तो अहवाल कुंटे यांना पाठवत हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून द्यावा, असे सांगितले. वाढत्या कोरोना प्रादुर्भावादरम्यान मुख्यमंत्र्यापर्यंत हा अहवाल पोहोचला. त्यामुळे कोणतीही कारवाई अथवा बदली झाली नाही.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर २८ सप्टेंबर रोजी सुबोध जयस्वाल यांना एक पत्र पाठविले, यात अहवालात नमूद केलेल्या बाबी सरकारने गांभीर्याने घेतल्याचे नमूद होते. त्या पत्रात जयस्वाल यांना असेही सांगण्यात आले होते की, त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात काय कारवाई करायची याबाबत पुराव्यासह प्रस्ताव पाठवावा. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेचे पत्र असूनही पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रस्ताव आला नसल्याचे कुंटे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहवालाच्या आधारे सरकारवर गंभीर आरोप केले. पुढे मार्च २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एक अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार, २५ मार्च रोजी तथ्यात्मक अहवाल दिला, अशी माहिती कुंटे यांनी ईडीला दिली. देशमुखांकडूनही याद्याअनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. मी त्यांच्या अधीन काम करत होतो व त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला मी नकार देऊ शकत नव्हतो. अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने मी वरिष्ठांचे आदेश समजून त्यांनी पाठवलेल्या यादीवर स्वाक्षरी करत असल्याचेही कुंटे यांनी जबाबात नमूद केले.
पोलीस बदल्या: अहवालावर जयस्वाल यांचे काहीही उत्तर नाही; कुंटे यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 8:50 AM