अनिल देशमुख यांच्या वकिलालाही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:22+5:302021-09-03T04:05:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्रीय गुन्हा अन्वेषण ...

Anil Deshmukh's lawyer also arrested | अनिल देशमुख यांच्या वकिलालाही अटक

अनिल देशमुख यांच्या वकिलालाही अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी त्यांचे वकील ॲड. आनंद डागा याला गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. सुमारे ९ तास कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात आले.

ॲड. डागा हा नागपूरचा असून सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याच्या समवेत कट रचून ‘पीई’ रिपोर्ट फोडला व त्यामध्ये छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तिवारी याला बुधवारी रात्री दिल्लीत अटक करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली व अहमदाबाद येथे सीबीआयच्या १० जणांच्या पथकाने बुधवारी दुपारी वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांनाही ताब्यात घेतले होते. मात्र त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.

अनिल देशमुख यांच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल गेल्या शनिवारी फुटला होता. सीबीआयने याप्रकरणी तातडीने चौकशी सुरू केली होती. ‘पीई’चा अहवाल फोडल्याप्रकरणी तपास सुरू केला. यामागे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक केली. तर त्याचवेळी मुंबईतून देशमुख यांचे जावई डॉ. चतुर्वेदी व ॲड. डागा याला ताब्यात घेतले होते. चतुर्वेदी यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले तर डागा हा तिवारीच्या संपर्कात असून त्याने अहवाल फोडून त्यामध्ये बदल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. याबाबत दिल्लीत गुन्हा दाखल असल्याने त्यांना मुंबईतील सीबीआयच्या न्यायालयाने हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. रात्री त्यांना दिल्लीला घेऊन पथक रवाना झाले.

Web Title: Anil Deshmukh's lawyer also arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.