Join us

Money Laundering : अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशने कोर्टात केला अटकपूर्व जामीन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:23 PM

Money Laundering Case : न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याने पीएमएलए विशेष कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांना २७ मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विरोध केला होता. जे. जे. रुग्णालयातही देशमुख यांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार मिळतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली. त्यावेळी अनिल देशमुखांना दिलासा देण्यास विशेष न्यायालयाचा नकार दिला होता. तर खासगी रुग्णालयाऐवजी जे. जे. रुग्णालयामध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. 

टॅग्स :अनिल देशमुखन्यायालयपैसाअंमलबजावणी संचालनालय