Join us

अनिल जयसिंघानीला सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 8:16 AM

मध्यप्रदेश पोलिसांनी अन्य एका प्रकरणात जयसिंघानीचा ताबा मागितला आहे

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि बॅंकर अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करून धमकावल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील व बुकी अनिल याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, मध्यप्रदेश पोलिसांनी अन्य एका प्रकरणात जयसिंघानीचा ताबा मागितला आहे. सोमवारी न्यायालयाने अनिक्षाचे वडील अनिल व काका निर्मल जयसिंघानी या दाेघांनीही न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्याकडून आणखी माहिती मिळवायची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यामुळे दाेघांनाही न्यायालयाने काेठडी सुनावली.

टॅग्स :अमृता फडणवीसपोलिस