शरद पवार, उद्धव ठाकरेंशी अनिल जयसिंघानीचे संबंध; अनिक्षाने दावा केल्याची पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:02 AM2023-03-28T07:02:31+5:302023-03-28T07:02:44+5:30

या कटात आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असावा. त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

Anil Jaisinghani's relationship with Sharad Pawar, Uddhav Thackeray; Police information that Anisha claimed | शरद पवार, उद्धव ठाकरेंशी अनिल जयसिंघानीचे संबंध; अनिक्षाने दावा केल्याची पोलिसांची माहिती

शरद पवार, उद्धव ठाकरेंशी अनिल जयसिंघानीचे संबंध; अनिक्षाने दावा केल्याची पोलिसांची माहिती

googlenewsNext

मुंबई : अनिक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी विशेष न्यायालयाला दिली.

या कटात आणखी काही राजकीय नेत्यांचा समावेश असावा. त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणे व त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी उपरोक्त माहिती न्यायालयाला दिली. २४ मार्चला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अनिक्षाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्या. ए. अल्माले यांनी तिचा जामीन मंजूर केला. 

१६ मार्चला अटक  

अनिक्षाविरोधात अमृता फडणवीस  यांनी २० फेब्रुवारीला मलबार  पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी १६ मार्चला तिला अटक केली.  अमृता फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, त्या अनिक्षाला नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा भेटल्या. 
 

Web Title: Anil Jaisinghani's relationship with Sharad Pawar, Uddhav Thackeray; Police information that Anisha claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.