अनिल परब यांनी साधला उत्तर मुंबईच्या पदवीधरांशी संवाद
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 23, 2024 14:10 IST2024-06-23T14:10:04+5:302024-06-23T14:10:14+5:30
या संवाद सत्राचे आयोजन मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले होते.यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर , काँग्रेस उपाध्यक्ष ॲड अशोक सुत्राळे आदि मान्यवर उपस्थित होते.

अनिल परब यांनी साधला उत्तर मुंबईच्या पदवीधरांशी संवाद
मुंबई-महाराष्ट्र विधान परिषद मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी मंत्री ॲड.अनिल परब यांनी बोरीवली पश्चिम उत्तर मुंबईतील पदवीधर व काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या संवाद सत्राचे आयोजन मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष भूषण पाटील, ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले होते.यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर , काँग्रेस उपाध्यक्ष ॲड अशोक सुत्राळे आदि मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत एकूण १२०००० पदवीधर मतदारांपैकी उत्तर मुंबईत २८ हजार पदवीधर मतदार आहेत.मुंबईत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ॲड अनिल परब यांच्या विजयासाठी उद्धव सेने सोबत उतरली असून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नोंदविलेले १५ हजार पदवीधर मतदार महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांना मतदान करतील. यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात तयारी केली असून उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला असंल्याची माहिती भूषण पाटील व ॲड. संदेश कोंडविलकर यांनी दिली.