१०० कोटींची महावसुली ३०० कोटींवर?, परिवहन विभागात घोटाळा; अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:39 PM2021-05-29T12:39:34+5:302021-05-29T12:40:52+5:30
राज्य सरकारची वसुली आधी १०० कोटींची होती. आता ही वसुली ३०० कोटींवर गेली आहे असा आरोप करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारची वसुली आधी १०० कोटींची होती. आता ही वसुली ३०० कोटींवर गेली आहे असा आरोप करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परिवहन विभागात महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (anil parab should resigns on corruption in transport department, says sandeep deshpande)
नाशिकमध्ये आरटीओचे निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागाच्या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. त्यानुसार गजेंद्र पाटील यांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
१०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? परिवहन मंत्री परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार, गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 29, 2021
मनसेनं याच मुद्द्यावरुन अनिल परब यांना लक्ष्य केलं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. देशपांडे यांनी ट्विट करुन काही सवाल उपस्थित केले आहेत. १०० कोटींची वसुली आता ३०० कोटींवर पोहोचली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांनी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनात तक्रार केली आहे. आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.