Anil Parab : अनिल परब यांची ईडीकडून १२ तास चौकशी; शासकीय निवासस्थानासह सात ठिकाणी टाकल्या होत्या धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 06:35 PM2022-05-26T18:35:21+5:302022-05-26T18:59:56+5:30
Anil parab : आज 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहे.
मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकऱणी ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. त्याचसोबत शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी याठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आज 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी पहाटे ईडीचे अधिकारी पोहचले होते. सीआरपीएफ जवानाच्या तुकड्याही त्यांच्यासोबत होत्या. वांद्रे येथील खासगी घरातही ईडीच्या अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन सुरू होतं. परब यांच्या संबंधित ७ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. अनिल देशमुख प्रकरणाचे तपास अधिकारी शिवालय बंगल्यात पोहचले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची तब्बल १२ तास चौकशी करण्यात आली. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला