Join us  

पशू-पक्ष्यांनाही उन्हाच्या झळा

By admin | Published: April 15, 2015 10:49 PM

उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने पशू-पक्ष्यांना पाण्यात गेल्याशिवाय गारवा मिळत नाही, म्हणूनच गुरे उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळविण्यासाठी डबक्यात, नदीत बसताना दिसत आहेत.

मोहोपाडा : उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने पशू-पक्ष्यांना पाण्यात गेल्याशिवाय गारवा मिळत नाही, म्हणूनच गुरे उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळविण्यासाठी डबक्यात, नदीत बसताना दिसत आहेत. पशू-पक्षी पाण्यात राहून शरीर थंड करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.शिवनगर, मोहोपाडा पात्रात गाई-म्हशी तप्त उन्हात गारवा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. उन्हाचा चढता पारा पाळीव जनावरांनाही असह्य झाला असून अंगाची होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी ही जनावरेही पाण्याच्या डबक्याचा आधार घेत आहेत. उन्हाचा पारा अधिकच वाढल्याने मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, मात्र सध्या हे पाळीव प्राणी बाळगणारे नागरिकच लग्नसराईच्या कार्यक्रमात गुंतलेले आहेत, त्यामुळे गुरांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने मुक्या प्राण्यांनी आपला मोर्चा पाण्याच्या ठिकाणी वळवल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)