बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितलेले प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते अडकले आहेत. यामुळे मुंडे यांच्यावरही आरोप सुरू आहेत. काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. तसेच त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली.
'बाबा सिद्दिकींच्या डायरीत सात बिल्डरांसह भाजप नेत्याचं नाव'; झिशान सिद्दिकींच्या जबाबाने खळबळ
मंत्री धनंजय मुंडे यांनी आपण यावर बोलणार नाही. यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे म्हणाले, या प्रकरणावरती मी स्वत: उत्तर देणार नाही, अंजली दमानिया या स्वत: अजित पवार यांना भेटल्या आहेत. त्या कागदपत्रासहीत भेटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावरती स्पष्ट उत्तर देतील, ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
थर्मल पॉवरचा निर्णय सुप्रीम कोर्टानेच दिला
"तुम्ही ज्या राखेचा २००६ चा सुप्रीम कोर्टाचा जीआर पाहिला तर थर्मल पॉवर स्टेशनची राख हा त्यांचा कचरा आहे. ती राख थर्मल पॉवर स्टेशनने स्वत: खर्च करुन उचलला पाहिजे. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. अशा निर्णयाच्या बाबतीत डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही, महानिर्मिती एक मंडळ आहे. त्यामुळे प्रॉफिट ऑफ बिझनेस हा विषय कुठे येत नाही, असंही मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
अंजली दमानिया यांनी केले आरोप
बीडची घटना माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे, त्याचे मी कुठेही समर्थन करत नाही, असे त्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. मग त्यावर माझे म्हणणे होते की, मग तुम्ही राजीनामा का घेत नाही. या प्रकरणातील सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज मी त्यांना दाखवले आहे की, कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र संबंध कसे आहेत. त्यांच्या कंपन्यांत आर्थिक नफा कसा मिळत आहे. तसेच ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसे बसत आहे. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असे सांगितले. गृह मंत्रालयाने आमदार, मंत्र्यांसाठी जे निर्देश दिले आहेत, तेही दाखवले आहेत, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.