अंजली दमानियांची नार्को टेस्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:16 AM2018-04-25T01:16:26+5:302018-04-25T01:16:26+5:30

कल्पना इनामदार : हायकोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल, अण्णांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे षड्यंत्र

Anjali Damaniya's Narco Test | अंजली दमानियांची नार्को टेस्ट करा

अंजली दमानियांची नार्को टेस्ट करा

Next

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची बदनामी करण्यासाठीच आरोप होत असल्याचा खुलासा सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला. मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दमानिया यांनी केलेल्या आरोपांविरोधात उच्च न्यायालयात १ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्याचे सांगत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही इनामदार यांनी केली.
इनामदार म्हणाल्या, दमानिया यांच्याकडून वारंवार वक्तव्यांत बदल केला जात आहे. याआधी प्रकरण दाबण्यासाठी मी धमकी दिल्याचे म्हणणाऱ्या दमानिया आता मी आॅफर दिल्याचे बोलत आहेत. त्यामुळे माझ्या नार्को टेस्टची मागणी करणाºया दमानिया यांची नार्को टेस्ट करावी. हे
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दमानिया यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्याने आपले खच्चीकरण करण्यासाठी धमकी, अश्लील कॉल येत असल्याची तक्रार दमानिया यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केली. गुंड रवी पुजारीच्या नावाने किशोर पुजारी याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर शांत राहण्याची धमकी दिल्याचा दावा दमानिया यांनी केला.

भाजपा मंत्र्यांनीच दिली खडसेंची सुपारी
माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमधील मंत्र्यांनीच सुपारी दिल्याचा गंभीर आरोप कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ललित टेकचंदानी आणि राजेश खत्री या दोघांच्या मदतीने ही सुपारी देण्यात आली. हे दोघे आधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काम करत होते. मात्र आता ते भाजपाला मदत करत असल्याचेही कल्पना इनामदार यांनी याप्रकरणी केलेल्या आरोपात म्हटले आहे.

Web Title: Anjali Damaniya's Narco Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.