योजनांच्या माहितीसाठी ‘अनुलोम’चे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:20 AM2018-03-16T05:20:47+5:302018-03-16T05:20:47+5:30

‘अनुलोम’ ही स्वयंसेवी संस्था जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण (गाळयुक्त शिवार) तसेच शेतकरी कर्जमाफी योजना अशा विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध शासकीय विभागांना सहकार्य करीत आहे, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिले.

'Anloam' collaboration for information about schemes | योजनांच्या माहितीसाठी ‘अनुलोम’चे सहकार्य

योजनांच्या माहितीसाठी ‘अनुलोम’चे सहकार्य

googlenewsNext

मुंबई : ‘अनुलोम’ ही स्वयंसेवी संस्था जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण (गाळयुक्त शिवार) तसेच शेतकरी कर्जमाफी योजना अशा विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध शासकीय विभागांना सहकार्य करीत आहे, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिले.
‘लोकमत’मध्ये १५ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘राजकीय लाभासाठी शासनाचा अनुलोम’
या वृत्ताबाबत माहिती खात्याने खुलासा केला आहे. ‘सोशल मीडिया महामित्र’ हा राज्यातील सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या आणि विधायक संदेशातून विवेकी समाज बनविण्याची उक्ती सार्थ ठरवू शकणाऱ्या व्यक्तींची निवड करून
त्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम आहे.
महासंचालनालयाच्या या उपक्रमाला अत्यंत अभिनव उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनुलोमच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी
या उपक्रमासाठी स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने विविध पातळीवर सातत्याने बैठका होणे स्वाभाविक असल्याचे महासंचालनालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: 'Anloam' collaboration for information about schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.