ऐन गणपतीत पाणीबाणी

By admin | Published: September 19, 2015 01:25 AM2015-09-19T01:25:35+5:302015-09-19T01:25:35+5:30

गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी पालिकेने लादलेली पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यात मालाड (पूर्व) इन्फिनिटी

Ann Ganapati Waterfall | ऐन गणपतीत पाणीबाणी

ऐन गणपतीत पाणीबाणी

Next

- मनोहर कुंभेजकर,  मुंबई
गणेशोत्सवात मुंबईकरांसाठी पालिकेने लादलेली पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यात मालाड (पूर्व) इन्फिनिटी आयटी पार्क येथील म्हाडा इमारत क्रमांक तीनसह अनेक म्हाडा इमारतींना सकाळी ७ ते ७.३० मध्येच पाणी येत आहे. ऐन गणेशोत्सवात येथील पाणीबाणीमुळे महिलावर्ग संतप्त झाला आहे. आम्ही आमचा घरगुती गणपती-गौरी उत्सव कसा साजरा करायचा, असा सवाल महिला उपस्थित करीत आहेत.
दिंडोशीतील महिलांनी सांगितले की, गेले काही महिने येथील म्हाडा वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. मात्र पालिकेने पाणीकपात केल्यापासून सकाळी ७ ते ७.३० आणि संध्याकाळी ७.१ ते ७.३० असा खूपच कमी पाणीपुरवठा होत आहे. याउलट येथील काही भागांना आयटी पार्क, मैत्री पार्क, रहेजा वसाहत यांना मात्र मुबलक पाणी मिळते, असा आरोप नागरिक करीत आहेत.
यासंदर्भात माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी गणेशोत्सवाच्या काळात दिंडोशी मतदारसंघातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करून जादा दाबाने पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत. तर येथील म्हाडा वसाहतीसाठी खास पाणी वितरणाचा मेगाप्रकल्प प्रभू यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित होणार आहे. तसेच त्यांच्या आमदार फंडातून नवीन २० बोअरवेलचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ann Ganapati Waterfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.