गुण्या-गोविंदाने नांदण्याचा रस्ता मोकळा- अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:33 AM2019-11-10T03:33:20+5:302019-11-10T03:33:32+5:30

अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे.

Anna Hazare, the road to Guna-Govinda, is open | गुण्या-गोविंदाने नांदण्याचा रस्ता मोकळा- अण्णा हजारे

गुण्या-गोविंदाने नांदण्याचा रस्ता मोकळा- अण्णा हजारे

googlenewsNext

मुंबई : अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांपासून या प्रश्नी वाद-विवाद होते. मंदिर-मशिदीच्या वादाचे अनेकांनी राजकारण केले. परंतु सर्वोच्च न्यायालय नेहमी आपला देश एकसंध ठेवत आले आहे. न्यायालयाने निकाल देताना मंदिर आणि मशिद या दोघांचेही निर्माण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता वाद-विवाद संपून गुण्या-गोविंदाने नांदण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला देश विविध जाती-धर्मांनी नटलेला आहे. तरी देखील आपण सगळे एक आहोत, हा एक मोठा संदेश या निकालातून घ्यायला हवा. या निकालानंतर एकमेकांचा विचार करणारी माणसे घडायला हवीत असे अण्णा म्हणाले.

Web Title: Anna Hazare, the road to Guna-Govinda, is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.