वृत्तपत्रविक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:36+5:302021-05-24T04:06:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वृत्तपत्रविक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी, फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करावे, जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना लस ...

Announce frontline workers to newsagents | वृत्तपत्रविक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करा

वृत्तपत्रविक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वृत्तपत्रविक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी, फ्रंटलाइन वर्कर म्हणून घोषित करावे, जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना लस उपलब्ध करून देण्यात यावी, वृत्तपत्र विक्रेता कोरोना लस शिबिर आयोजित करावे, बाधित व सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणून आर्थिक मदत मिळावी, असंघटित कामगार म्हणून लवकरात लवकर नोंदण्या सुरू कराव्यात, अभ्यास समितीचा अहवाल लागू करावा आदी मागण्यांचे निवेदन एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, आरोग्यमंत्री यांना देण्याचे ठरले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक १७ मे रोजी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर याप्रसंगी राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी राज्यातील जिल्हानिहाय कोरोनाबाधित, निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांची, राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी विषयी, कोरोनामुळे किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली.

कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी. कोरोनाची लस उपलब्ध करून दिली पाहिजे. निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत करावी. बाधितांना मदत करावी, अशा मागण्या यावेळी पुढे आल्या, तर यावर राज्य संघटनेच्यावतीने काही व्यवस्थापनाकडे निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विनंती केल्याची माहिती सरचिटणीस बालाजी पवार यांनी दिली. व्यवस्थापनाकडून सकारात्मक विचार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी सर्व व्यवस्थापन किंवा शासनावर अवलंबून न राहता आपण काहीतरी केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, शिवाजी खेडकर, कोकण विभाग निमंत्रक प्रभारी दत्ता घाडगे, सदस्य राजू टिकार, मनीष राजनकर, जगदीश उमरदंड, भारत माळवे, दत्ता ठाकरे यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिती सादर केली. कोषाध्यक्ष गोरख भिलारे मनीष वासनिक, सूर्यकांत टेंबे, महेश कुलथे, रवींद्र कांबळे, किशोर सोनवणे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Announce frontline workers to newsagents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.