एमएचटी-सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; १ ते २० ऑक्टोबरदरम्यान पीसीबी, पीसीएमच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 01:49 AM2020-09-10T01:49:11+5:302020-09-10T07:00:28+5:30

सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया लवकरच सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

Announced revised dates for MHT-CET exams; PCB, PCM exams from 1st to 20th October | एमएचटी-सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; १ ते २० ऑक्टोबरदरम्यान पीसीबी, पीसीएमच्या परीक्षा

एमएचटी-सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; १ ते २० ऑक्टोबरदरम्यान पीसीबी, पीसीएमच्या परीक्षा

googlenewsNext

मुंबई : एमएचटी-सीईटीच्या पीसीबी (भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्र) गटाच्या परीक्षा १ ते ९ आॅक्टोबरदरम्यान तर पीसीएम (भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित) गटाच्या परीक्षा या १२ ते २० आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंबंधित अधिकृत घोषणा सीईटी सेलने केली असून, याचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया लवकरच सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

आता आॅक्टोबरच्या १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना पीसीबी गटाच्या तर १२, १३, १४, १५, १६, १९, २० आॅक्टोबरला पीसीएम गटाच्या परीक्षा होतील. राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

Web Title: Announced revised dates for MHT-CET exams; PCB, PCM exams from 1st to 20th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा