बिग बी मुळे अडली रेडिओ स्टेशनची उदघोषणा
By admin | Published: August 16, 2016 04:55 AM2016-08-16T04:55:58+5:302016-08-16T04:55:58+5:30
बंदींच्या मनोरंजनासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाने रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले आहे. या टीसीपीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची तारीख मिळत
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
बंदींच्या मनोरंजनासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाने रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले आहे. या टीसीपीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची तारीख मिळत नसल्याने त्याचे उद्घाटन मात्र खोळंबले आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींचे ज्ञानाबरोबर मनोरंजन व्हावे, त्यांचा वेळ चांगला जावा तसेच त्यांना चांगली गीते ऐकायला मिळावी, या उद्देशाने कारागृह प्रशासनाने रेडिओ स्टेशन म्हणजेच टीसीपी तयार केले आहे. या टीसीपीसाठी सुसज्ज अशी रूमदेखील तयार केली आहे. या रेडिओ स्टेशनवर बंदींच्या आवडीची हिंदी-मराठी गीते लावली जाणार आहेत. तसेच, बंदींचे भजन, प्रवचन यासारखे विविध कार्यक्रम या टीसीपीद्वारे प्रसारित केले जाणार आहे. येथे रेडिओ जॉकी म्हणून बंदीच काम करणार आहेत. यासाठी निवडक पाच ते सहा बंदींना आर.जे शंतनू जोशी हे प्रशिक्षण देणार असल्याचे कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले. सध्या हे कारागृहापुरतेच असून काही कालावधीनंतर ठाणे जिल्ह्यात याचे केंद्र उभारले जाणार आहे. याबाबत केंद्रीय दूरसंचार विभागाला पत्र दिले असून त्यांची परवानगी मिळाल्यास ते जिल्ह्यात उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.
या टीसीपीच्या सर्वच जण प्रतीक्षेत असले तरी बच्चन यांची तारीख मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडले आहे.