मुस्लीम आरक्षणासाठी मुंबईत ११ डिसेंबरला माेर्चा, खासदार असदुद्दीन ओवैसी यांची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:53 PM2021-11-24T12:53:01+5:302021-11-24T12:54:03+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात एमआयएम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात मुस्लीम समाजातील युवकांनी तिरंगा झेंडा लावून सहभागी व्हावे. पक्षीय जाेडे बाजूला ठेवून या माेर्चात यावे, असे आवाहनही करण्यात आले.
साेलापूर : मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मंडळाच्या जमीन घाेटाळ्यांतील दाेषींवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी ११ डिसेंबरला मुंबईत महामाेर्चा काढण्यात येत असल्याचे एआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात एमआयएम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बाेलत हाेते. मुंबईत हाेणाऱ्या माेर्चात मुस्लीम समाजातील युवकांनी तिरंगा झेंडा लावून सहभागी व्हावे. पक्षीय जाेडे बाजूला ठेवून या माेर्चात यावे, असे आवाहनही करण्यात आले.
गाडीला नंबर प्लेट नसल्याने ओवैसींना दंड कारच्या समोरील बाजूस नंबर प्लेट नसल्याने खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत २०० रुपयांचा दंड केला.