Join us

राष्ट्र सेवा दलाच्या सावित्रीच्या लेकी पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात विशेष काम केलेल्या नायर रुग्णालयातील प्रिया बांदेकर, ‘लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्ट’ ही स्वयंसेवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात विशेष काम केलेल्या नायर रुग्णालयातील प्रिया बांदेकर, ‘लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्ट’ ही स्वयंसेवी संस्था, कोरोनाकाळात धान्य, जेवण, औषधे, रुग्ण शोधण्याच्या कामात मालवणी परिसरात काम करणाऱ्या वैशाली महाडिक आणि सफाई कामगार म्हणून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कल्पना रुडे यांना यंदाचा राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दिला जाणारा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

नायर रुग्णालयातील सर्व नर्सेसच्या वतीने प्रिया बांदेकर आणि लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्टच्या वतीने मितवा मुक्ता अनीश या पुरस्कार स्वीकारतील. गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे रविवारी ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता अभिनेते सुनील बर्वे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा सावित्री उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन सेवा दलाने केले आहे. सावित्रीच्या ओवी, सावित्री - जोतिबा यांचे साहित्य, शेतकरी बांधवांबाबत लिहिलेले ‘शेतकऱ्यांचा आसूड’ यातील काही उताऱ्यांचे वाचन करून सावित्रीबाईंची आठवण जागवावी, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाने केले.

............................