Join us

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा, संजय राऊत, रामदास कदम यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 2:23 PM

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहे.

मुंबई- 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही यादी जाहीर केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह या स्टार प्रचारकांच्या यादीत सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गीते, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसाळकर, नीलम गोऱ्हे, लक्ष्मा वढले, नितीन पाटील, वरूण सरदेसाई, राहुल लोंढे यांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे स्टार प्रचारक शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. आपल्या पक्षाचे ध्येय धोरण मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सर्वच पक्षांना कालावधी कमी पडणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची व्याप्ती आणि निवडणुकीत उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे कार्यकर्त्यांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे प्रत्येक पक्षाचा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आणि सभेत जास्त गर्दी जमवण्याची स्टार प्रचारकांवर जबाबदारी असणार आहे. प्रचारासाठी काही दिवसांचाच कालावधी मिळणार आहे. यात शेवटचे दोन दिवस जाहीर प्रचार थांबणार असून, अवघ्या काही दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. स्टार प्रचारक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार असून, त्यामुळे जनतेची चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकशिवसेनाउद्धव ठाकरे