कोरोना उपचारांसाठी राज्यात तीस विशेष रुग्णालयांची घोषणा; प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 12:47 AM2020-04-03T00:47:46+5:302020-04-03T06:45:53+5:30

रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे

Announces Thirty Special Hospitals in the State for Corona Treatment; Effective measures for prevention | कोरोना उपचारांसाठी राज्यात तीस विशेष रुग्णालयांची घोषणा; प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना

कोरोना उपचारांसाठी राज्यात तीस विशेष रुग्णालयांची घोषणा; प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना

Next

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २,३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शासनाच्या अधिसूचनेनुसार, या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

अधिसूचीत रुग्णालये व त्यांच्या खाटांची क्षमता

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भार्इंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोंबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पटल अनुक्रमे (१००) (७०), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदुर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०), अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००), वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलडााणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Announces Thirty Special Hospitals in the State for Corona Treatment; Effective measures for prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.