लोकलमधील जाहिरातीची उद्घोषणा ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:03 AM2019-08-12T04:03:34+5:302019-08-12T04:04:25+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये अचानकपणे उद्घोषणेद्वारे प्रवाशांना विनाकारण जाहिरात ऐकवली जाते.

Announcing an advertisement in the local is a headache for passenger | लोकलमधील जाहिरातीची उद्घोषणा ठरतेय डोकेदुखी

लोकलमधील जाहिरातीची उद्घोषणा ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये अचानकपणे उद्घोषणेद्वारे प्रवाशांना विनाकारण जाहिरात ऐकवली जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रवाशांचे हित नसल्याने पश्चिम रेल्वे प्रशासन प्रवाशांना जाहिरात ऐकविण्यास का भाग पाडत आहे, असा सवाल प्रवाशांकडून केला आहे.

काही वर्षापूर्वी पश्चिम रेल्वेतील प्रवास शांतपणे होत होता. अचानकपणे लोकलमध्ये जाहिरात सुरू होते. प्रवासातील शांतता भंग होतो. जाहिरातील खाद्यपदार्थांच्या जाहिराती, मालिकेच्या जाहिराती ऐकविल्या जातात. याचा प्रवाशांना कोणताही लाभ होत नाही. प्रवाशांना या जाहिरात मोबाइल, टिव्ही याद्वारे कळतात. पश्चिम रेल्वेने महसूलासाठी प्रवाशांचा शांतता भंग करू नये, असे एका महिला प्रवाशांकडून सांगण्यात आले.

रेल्वे जाहिरात ऐकवते, पण लोकल खोळंबाची माहिती देत नाही़ लोकलमध्ये स्पीकरची सुविधा दिली आहे. यामधून प्रवाशांना जाहिरात ऐकवली जाते. यातून पश्चिम रेल्वे प्रशासनाला लाखोंचा महसूल मिळतो. अनेक वेळा लोकल उशीराने चालविण्यात येतात. याची माहिती लोकलमधील स्पीकरद्वारे दिली जात नाही. रेल्वे रूळाला तडे जाणे, ओव्हर हेड वायर तुटणे, शॉर्ट सर्किट होणे, अशा घटनाची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.

Web Title: Announcing an advertisement in the local is a headache for passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.