एमएचटी-सीईटीचे अंतिम वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 06:15 AM2019-04-16T06:15:01+5:302019-04-16T06:15:03+5:30
यंदा प्रथमच या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असून, संभाव्य वेळापत्रकानंतर आता अंतिम वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई : यंदा प्रथमच या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असून, संभाव्य वेळापत्रकानंतर आता अंतिम वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे. मेडिकल, फार्मसी, इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा २ ते १३ मे दरम्यान होईल. विशेष म्हणजे, सीईटी सेलने वेळापत्रकात परीक्षांचे दिवस आणि शिफ्ट्स यांच्याही वेळापत्रकाचा तपशील दिला
आहे.
परीक्षेसाठी ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. सीईटी सेलकडे ४५ हजार संगणक असल्याने, परीक्षा दोन शिफ्ट्समध्ये होईल. परीक्षेसाठी राज्यभरातील ३६ जिल्ह्यांत १७० केंद्रे आहेत.
दरम्यान, हे वेळापत्रक
अंतिम असून, निवडणुकीमुळे
काही बदल झाले तरच त्यात बदल होईल. आॅनलाइन परीक्षेमुळे परीक्षांची अचूक, अधिक माहिती विद्यार्थ्यांना वेबसाइटवर मिळावी, यासाठी हे नियोजन केल्याची प्रतिक्रिया सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी
दिली.