अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:33 AM2019-06-24T06:33:08+5:302019-06-24T06:33:19+5:30
सीईटी सेलकडून १७ जूनला सुरु झालेल्या अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रच्या प्रवेश प्रक्रियेला अनेक तांत्रिक कारणांमुळे स्थगिती देण्यात आली होती.
मुंबई - सीईटी सेलकडून १७ जूनला सुरु झालेल्या अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रच्या प्रवेश प्रक्रियेला अनेक तांत्रिक कारणांमुळे स्थगिती देण्यात आली होती. रविवारी, २३ जून रोजी उशिरा या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या ४ लाखांहून अधिक विद्याथ्यार्साठी आज अखेर पुढील प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले
आहे. सोमवारपासून या प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार असून, नोंदणीची मुदत ३० जूनपर्यंत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये नोंदणी करून कागदपत्रे पडताळणी करून घेण्याचे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे.
यंदा ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली आहे. मात्र व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नियमावली तयार करण्यास विलंब झाल्याने शिवाय प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेले आहे.
सेतू केंद्र रद्द, आता एफसी सेंटर
तालुकानिहाय सुरु करण्यात आलेली सेतू केंद्र रद्द करण्यात आली असून, आता एफसी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्या एफसी केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश पूर्ण केले होते आणि पैसे भरले होते ती यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली असून, त्यांची नावेही देण्यात आली आहेत. त्या विद्यार्थ्यांना पैसे परत केले जाणार आहेत. या नव्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना पैसे पुन्हा भरावे लागणार आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. मानिक गुरसाळ यांनी दिली.
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक :
आॅनलाईन नोंदणी - २४ जून ते ३० जून
अर्ज निश्चिती - २५ जून ते १ जुलै (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी - २ जुलै
तक्रार नोंदविणे - ३ ते ४ जुलै (सायंकाळी ५ पर्यंत )
अंतिम गुणवत्ता यादी - ५ जुलै