मुंबई : मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंटच्या सत्रात यंदाच्यावर्षी सर्वाधिक प्लेसमेंट ही मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळाली असून वार्षिक १ कोटी १७ लाख रुपयांचं पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून देण्यात आलं आहे. मागीलवर्षी सुद्धा मायक्रोसॉफ्ट कंपनीने १ कोटी १४ लाख रुपयांचे पॅकेज पहिल्याच दिवशी दिले होते.मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंटच्या सत्राला आजपासून सुरवात झाली असून पहिल्या फेरीमध्ये मुंबई आयआयटी प्लेसमेंट सिजनमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा एकूण १८ कंपन्यांनी प्लेसमेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून वार्षिक १ कोटी १७ लाख रुपयांचं पॅकेज मायक्रोसॉफ्ट देण्यात आलं आहे.तर मायक्रोसॉफ्ट कंपनी खालोखाल आॅप्टिव्हर कंपनीने जवळपास वार्षिक १ कोटी २ लाख रुपयांचे तर उबेर या विदेशी कंपन्यांनी सुद्धा जवळपस वार्षिक १ कोटी २ लाखांचे पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले आहे.दुसरीकडे स्वदेशी-देशांतर्गत सुद्धा कंपन्या या प्लेसमेंट सत्रात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक क्वालकॉम या कंपनीकडून वार्षिक ३२.५९ लाख रुपयांचे तर गुगलकडून वार्षिक ३२ लाख रुपयांचे, गोल्डमन सॅक कंपनीकडून वार्षिक ३१.५० लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. आज झालेल्या प्लेसमेंटमध्ये आयटी/ सॉफ्टवेअर, कोअर इंजिनिअरिंग, फायनान्स अँड कन्सलटिंग या क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या मिळाल्याचं चित्र आहे.पहिल्या दिवशी आयआयटीतील ११० विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून प्लेसमेंट सिजनच्या पुढच्या स्लॉटमध्ये आणखी विदेशी आणि देशांतर्गत कंपन्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे. यामध्ये मोयक्रोसॉफ्ट, गुगल, टेकसास इन्स्ट्रुमेंटल, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप यासारख्या आणि काही नव्याने सहभागी होणा-या कंपन्यांचा या प्लेसमेंट सेलमध्ये सहभाग असणार आहे
मायक्रोसॉफ्टकडून वार्षिक १.१७ कोटी रुपयांचे पॅकेज; मुंबई आयआयटच्या प्लेसमेंट सत्राला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:33 AM