Join us

शुल्क भरले नाही म्हणून अडवले जात आहेत विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:07 AM

मनविसेचा आराेप; कारवाईच्या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळेचे शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल दिले ...

मनविसेचा आराेप; कारवाईच्या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शाळेचे शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल दिले जाणार नाहीत; तसेच ऑनलाइन पोर्टलवरून त्यांना वार्षिक परीक्षा देण्यासही शाळा मज्जाव करत असल्याच्या असंख्य तक्रारी पालक करीत असल्याचा मनविसेचा आराेप आहे. या सर्व तक्रारी घेऊन मनविसेचे शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांकडे गेले आणि त्यांनी यासंदर्भात निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली.

आधीच लॉकडाऊन आणि कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची असताना शाळांकडून अशा धमक्या पालकांना येणे आणि ऑनलाइन शिक्षणात अडथळा आणणे म्हणजे मनमानी कारभार आहे. अशा शाळांना शिक्षण विभागाने वेळीच आवर घालावा, अशी मागणी मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.

हप्त्याहप्त्याने शुल्क भरण्याचे आदेश सरकारनेच दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी शाळांनी केली नाही, उलट पालकांना आणि विद्यार्थ्यांना आता ऐन परीक्षेच्या काळात त्रास देण्याचा प्रकार सुरू केला आहे, असेही मनविसेने निवेदनात नमूद केले आहे.