Join us

वार्षिक पगार ५४ लाख रुपये ! मायक्रोसॉफ्ट कंपनीने दाेन विद्यार्थ्यांना दिले सर्वात मोठे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:04 IST

एकाच कंपनीकडून ४१ विद्यार्थ्यांना ४५ लाख वेतन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यंदा आयआयएम, मुंबईच्या १०० टक्के विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट झाली आहे. त्यात ॲक्सेंचर या एकाच कंपनीने ४१ विद्यार्थ्यांना ४५ लाख ३७ हजार रुपये पगाराचे वार्षिक पॅकेज दिले आहे. सर्वाधिक ५४ लाख रुपयांचे पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीने दोन विद्यार्थ्यांना दिले आहे.

पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग संस्थेचे दीड वर्षांपूर्वी आयआयएम- मुंबईमध्ये रुपांतरण झाले. त्यानंतर संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा ओघ वाढला आहे, तसेच विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीद्वारे नोकरी देण्यासाठीही कंपन्यांचा ओघ वाढला आहे. यंदा संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय अशा १९८ कंपन्या कॅम्पस निवडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ कंपन्यांची भर पडली आहे. त्यातील ४० कंपन्या कॅम्पस निवडीत पहिल्यांदाच सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी संस्थेतून यावर्षी बाहेर पडणाऱ्या ४८० विद्यार्थ्यांना जवळपास ५०० ऑफर्स देऊ केल्या आहेत. यामध्ये ३७६ विद्यार्थी आणि १०३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. 

ऑफर्समध्ये १० टक्के वाढ

  • गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना मिळालेल्या ऑफर्समध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती आयआयएम, मुंबईचे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी दिली.
  • कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ऑफर्स मिळालेल्या २० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीचा यापूर्वीचा अनुभव नाही. अन्य विद्यार्थ्यांना सरासरी १८ महिन्यांचा अनुभव होता, असेही यावेळी अधिकऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सरासरी ४१ लाखांचे पॅकेज

आयआयएम, मुंबईमधील टॉपच्या १० टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ४७.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे, तर टॉपच्या २० टक्के विद्यार्थ्यांना ४१.२ लाख रुपये आणि टॉपच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना ३४.१ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण पॅकेजमध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सगळ्यात कमी पगार वार्षिक १८ लाख रुपयांचे पॅकेज दिले.

फार्मा, हेल्थकेअर सेक्टरमधील कंपन्यांमध्ये वृध्दी

  • यंदा आयआयएम, मुंबईच्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट देणाऱ्यांमध्ये फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये १३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
  • रिटेल आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील ऑफर्समध्ये ४७.७३ टक्के, कन्सल्टिंग सेक्टरमध्ये २८.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी एफएमसीजी आणि आयटी टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांच्या नोकऱ्यांमध्ये काहीशी घट झाली आहे. 
  • यात ई-कॉमर्समधील कंपन्यांनी ६५ विद्यार्थ्यांना, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी ८० विद्यार्थ्यांना आणि बँकिंग-फायनान्स कंपन्यांनी ५० विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या, तर १६० विद्यार्थ्यांना पीपीओने ऑफर्स दिल्या आहेत.

कंपन्या आणि ऑफर्सकंपनी नाव    विद्यार्थीॲक्सेंचर    ४१ पीडब्लूसी इंडिया    १८ ब्लिंकीट    १४ पीडब्लूसी     १०यूएस ॲडव्हायजरी मायक्रोसॉफ्ट    २

टॅग्स :मायक्रोसॉफ्ट विंडोआयआयटी मुंबई