दारूची दुकाने लवकर उघडण्यास अंनिसचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:30 AM2018-12-19T04:30:44+5:302018-12-19T04:31:05+5:30

अंनिसचा संकल्प : राज्यभर जनजागृती मोहीम राबवणार

Anonymous opposes to open liquor shops early | दारूची दुकाने लवकर उघडण्यास अंनिसचा विरोध

दारूची दुकाने लवकर उघडण्यास अंनिसचा विरोध

Next

मुंबई : राज्यातील दुकाने सकाळी १० ऐवजी सकाळी ८ वाजताच सुरू करण्यास परवानगी देणाऱ्या शासन निर्णयास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कडाडून विरोध केला आहे. शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. तसेच व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचामार्फत १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही प्रबोधन मोहीम राबवण्याची घोषणाही या वेळी केली.

पाटील म्हणाले, २०२० सालापर्यंत व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अंनिसने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी व्यसनमुक्तीसाठी काम करणाºया सर्व संस्था व संघटनांच्या सहभागाने समर्थन पत्रावर पाठिंबा घेऊन २८ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाईल. या निवेदनातून सकाळी ८ वाजता दुकाने उघडण्यास परवानगी देणाºया ७ जून २०१७ च्या परिपत्रकाचा निषेधही केला जाईल. तसेच राज्यव्यापी मोहीम राबवताना ३६ जिल्ह्यांमध्ये ३५० पेक्षा जास्त शाखांमधून प्रचार, प्रसार केला जाईल. अंनिसला ९ आॅगस्ट २०१९ रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ३ ते १२ जानेवारीपर्यंत महिला सबलीकरण सप्ताह साजरा करण्या येईल. २६ जानेवारीपर्यंत संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जाईल़
 

Web Title: Anonymous opposes to open liquor shops early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.