Join us

दुबई-मुंबई विमानात बॉम्बची अफवा; निनावी फोनने सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 6:00 AM

दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या विमानात आरडीएक्स ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या अफवेमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण व तेथील सुरक्षा यंत्रणेची काही काळ धावपळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :दुबईहूनमुंबईकडे येत असलेल्या विमानात आरडीएक्स ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या अफवेमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण व तेथील सुरक्षा यंत्रणेची काही काळ धावपळ उडाली. संपूर्ण विमानाची कसून झाडाझडती घेतल्यानंतर, त्यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, दुबई-मुंबई विमानामध्ये आरडीएक्स ठेवण्यात आले आहे, अशी माहिती एका निनावी फोनद्वारे दुबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यांनी त्याबाबत तातडीने दिल्ली एटीसीला कळविले. त्यांनी मुंबईत ही माहिती कळवून खबरदारी घेण्याची सूचना केली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याची कसून तपासणी केली; पण त्यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. या अफवेबद्दल नोंद घेण्यात आली असून, फोन करणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :विमानतळदुबईमुंबई