Join us

आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष ट्रेन धावणार, 36 लाख मजुरांचा प्रवास होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 8:08 PM

रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी  श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत.

मुंबई : लॉकडाऊन काळात देशभरात अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू आहेत. देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांची संख्या अधिक असल्याने आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष  ट्रेन पुढील १० दिवसात चालविण्याचा  निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे ३६ लाख मजुरांना घरी जाता येणार आहे.            रेल्वे मंत्रालयाद्वारे कामगार दिनी म्हणजे १ मेपासून श्रमिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी  श्रमिक विशेष ट्रेन धावत आहेत. राज्य शासन आणि रेल्वेच्या समन्वयातून या गाड्या सोडण्यात येत आहेत. एका ट्रेनमधून १ हजार ५००   ते १ हजार ७०० मजुरांना पाठविण्यात येते. मात्र, मजुरांची संख्या अधिक असल्याने श्रमिक ट्रेन वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार पुढील १० दिवसात २ हजार ६००  श्रमिक विशेष  ट्रेन चालविण्यात येणार आहे. त्याआधारे ३६ लाख मजुरांना प्रवास करता येईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. मागील २३ दिवसात रेल्वेने २ हजार ६०० श्रमिक ट्रेनद्वारे ३६ लाख मजुरांना सुखरुप त्यांच्या मूळ गावी पोहोचविले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.  

टॅग्स :मुंबईरेल्वेकोरोना वायरस बातम्यास्थलांतरण