Join us

बेस्टच्या ताफ्यात आणखी एसी दुमजली बस!

By रतींद्र नाईक | Published: August 21, 2023 6:21 PM

प्रवासी एसी डबलडेकर गाड्यांची संख्या वाढणार

मुंबई: मुंबईकरांना लवकरच गारेगार आणि किफायतशीर प्रवासाची अनुभूती मिळणार आहे. बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात आणखी डबलडेकर बस उतरवण्याचा निर्णय घेतला असून एसी डबलडेकर गाड्यांची संख्या २० पेक्षा जास्त होणार आहे. या गाड्यांचे रजिस्ट्रेशन झाले असून लवकरच या गाड्या मुंबईतील विविध मार्गांवर धावणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यात सद्या १२ डबलडेकर बस असून या गाड्या दक्षिण मुंबईत चालवल्या जातात. जुन्या साध्या डबलडेकर गाड्या येत्या काही दिवसात कालबाह्य होणार असल्याने इतर बेस्टच्या गाड्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे उपक्रमाने एसी डबलडेकर बस ताफ्यात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. उपक्रमाने ९०० इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २०० बसेसचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून होणार आहे. स्विच मोबॅलिटीकडून १२ बसेसचा पुरवठा यापूर्वीच झाला आहे. उर्वरित बसेस आठवडाभरात दाखल होतील त्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :मुंबईबेस्ट