Join us  

पालिका आरेत उभारणार अजून एक अतिरिक्त कृत्रिम तलाव

By मनोहर कुंभेजकर | Published: September 26, 2023 6:50 PM

लोकमतने देखिल सातत्याने हा विषय मांडला आहे.

मुंबईमुंबई उच्च न्यायालयाने आरे तलावात सर्व प्रकारच्या गणेश विसर्जनाला बंदी घातली आहे.नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून पी दक्षिण विभागाने गोरेगाव (पूर्व ) आरेच्या छोटा काश्मीर ( ओ.पी.उद्यानात) येथे उभारलेल्या कृत्रिम तलावाच्या बाजूलाच अजून एक कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे.पी पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी ही माहिती दिली.लोकमतने देखिल सातत्याने हा विषय मांडला आहे.

आज दुपारी पालिका मुख्यालयात मुंबई महापालिका आयुक्त तथा अध्यक्ष - पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली.या बैठकीत समितीचे सचिव,परिमंडळ 4 चे उपायुक्त विश्वास शंकरवार,राजेश अक्रे तसेच इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.यावेळी छोटा काश्मीर ( ओ.पी.उद्यानात) येथे उभारलेल्या कृत्रिम तलावाच्या बाजूलाच अजून एक कृत्रिम तलाव उभारण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अक्रे यांनी दिली.त्यामुळे दोन कृत्रीम तलावा व्यतिरिक्त आरे चेक नाक्यावर चार आणि पिकनिक स्पॉट जवळ दोन असे ट्रकवर  एकूण सहा फिरत्या कृत्रिम तलावांची देखिल पालिका प्रशासनाने सुविधा यापूर्वीच केली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या एका दिवसात सदर अतिरिक्त कृत्रिम तलाव उभारला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.येत्या गुरुवार दि,28 रोजी अनंत चतुर्थीला गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबई