मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व राखणारे कृपाशंकर सिंह गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला.
मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 6:45 PM