अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी; विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:31 AM2019-09-22T04:31:53+5:302019-09-22T06:41:10+5:30
प्राध्यान्य फेरीचा तिसरा टप्पा उद्यापासून
मुंबई : अद्यापही अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. याचे वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असून याची सुरुवात २३ सप्टेंबरपासून होऊन १ आॅक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. ही अकरावी प्रवेशासाठीची विद्यार्थ्यांना शेवटची संधी असून विद्यार्थी, पालकांनी विहित मुदतीमध्ये यासाठी प्रक्रिया करावी, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर रोजी या फेरीची प्रक्रिया सुरू होत असून सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचे आहेत त्यांच्यासाठी प्रवेश रद्द करण्याची लिंक देण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थी आपले प्रवेश रद्द करू शकणार आहेत. त्यानंतरच ते या फेरीत सहभागी होऊ शकतील. मात्र ही फेरी आधीच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीप्रमाणेच असून रिक्त जागेवर जो विद्यार्थी
अर्ज करेल त्याला त्या जागेवर प्रवेश मिळेल अशीच असणार आहे. त्यामुळे प्रवेश रद्द करूनही हव्या त्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी स्वत:च जबाबदार राहील, असे उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य फेरी ३ मध्ये विद्यार्थी प्रवेशाचे २ प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात ३५ टक्के गुण मिळवून राज्य मंडळाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. तर दुसºया प्रकारामध्ये जे विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी एटीकेटीद्वारे पात्र ठरले आहेत आणि पहिल्या प्रकारात ज्यांना प्रवेश मिळू शकला नाही असे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
२३ ते २६ सप्टेंबरदरम्यान पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येऊन २७ रोजी प्रवेशप्रक्रिया होईल. २८ सप्टेंबर रोजी दुसºया प्रकारची रिक्त जागांची यादी जाहीर होऊन ३० सप्टेंबर रोजी याची प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
दोन्ही प्रवेश प्रक्रियांच्या वेळी विद्यार्थ्यांनी दुसºया दिवशी योग्य कागदपत्रांसह महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन मुदतीमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी अकरावी प्रवेशाची अंतिम रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आतापर्यंत ९० हजार जागा रिक्त
अकरावी प्रवेशाच्या यंदा तीन नियमित फेºया, एक विशेष फेरी आणि दोन प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण सात फेºया पार पडल्या. तरी अद्याप सात फेऱ्यांनंतर मुंबई विभागात तब्बल ९० हजारांपर्यंत जागा रिक्त असल्याची माहिती सहायक उपसंचालक बाबर यांनी दिली. उपसंचालक कार्यालयाकडे पालक आणि विद्यार्थ्यांच्या आलेल्या मागणीमुळे अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.